हळवल पवारवाडी येथील युवक बेपत्ता

Edited by:
Published on: February 21, 2025 11:32 AM
views 638  views

कणकवली : येथील उपजिल्हा रूग्णालयातील वॉर्डबॉय अजय अनंत पवार ( वय ३४ ) हा १९ फेब्रुवारी रात्रीपासून बेपत्ता झाला आहे. अशी खबर त्याचा भाऊ अक्षय याने पोलिसात दिली आहे. अजय रात्री घरी चालत जाताना त्याचा चुलत भाऊ प्रकाश पवार याला हळवल माळावर दिसला. त्यानंतर तो घरी गेलाच नसल्याचे फिर्यादित म्हटले आहे. त्यांची उंची १६५ से.मी. असून डोकीवर मध्यम केस आहेत. निळया रंगाचा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट त्याने घातली आहे. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास कृपया कणकवली पोलिस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.