दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता..!

युवा रक्तदाता संघटना धावली मदतीला
Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2024 05:39 AM
views 163  views

सावंतवाडी : शस्त्रक्रियेसाठी दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटना पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे सरसावली. दुर्मिळ रक्तगटाच्या दात्यांनी तात्काळ धाव घेत रक्तदान केले. यामुळे रूग्णांवर यशस्वी रित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी विशेष मेहनत घेतली. 


यामध्ये लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे बायपास सर्जरीसाठी दाखल असलेल्या रुग्णाला दुर्मिक रक्ताची आवश्यकता होती. अशावेळी युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य  संदीप निवळे व अवधूत गावडे यांनी ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाचे रक्तदान केले. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल‌ असलेल्या गर्भवती महिलेला शस्त्रक्रियेदरम्यान ए निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असताना संघटनेचे पंकज बिद्रे यांनी रक्तदान केले. तर गोवा बांबोळी येथील बायपास सर्जरी दरम्यान बी पॉझिटिव्ह या रक्तगटाची आवश्यकता असताना मयुर गावडे यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले.