
देवगड : देवगड तालुक्यातील तळवडे येथील सध्या राहणार मुंबई मंगेश अनिल आईर, वय ३४, यांचे त्यांच्या तळवडे येथील राहत्या घरी रात्री ३ वा.च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.
वाडीतील युवा कार्यकर्ते तसेच एक मनमिळाऊ स्वभाव म्हणून त्यांची गावात ओळख होती. त्यांच्या या अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.