युवा कवयित्री अक्षता गावडेचा मनसेकडून सन्मान..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 06, 2023 15:20 PM
views 144  views

सावंतवाडी : तालुक्यातील आरोस गावातील नवोदित युवा कवयित्री कूमारी अक्षता आजित गावडे हीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी मार्फत सत्कार करण्यात आला. अक्षता अजित गावडे ही आरोस गावातील मुलगी ही नवोदय विद्यालय सांगली येथे अकरावी मध्ये शिकत असून तिला लहानपणापासून कविता लिहिण्याचा छंद होता. याच आवडीतून तीचा 'क्षणीक' हा काव्य संग्रह नुकताच प्रदर्शित झाला.या निमित्ताने मनसेचे माजी आमदार तथा राज्य सरचिटणीस जीजी उपरकर यांच्या हस्ते आज सावंतवाडी येथे तिचा शाल व पुष्प गुच्ष देऊन सत्कार करण्यात आला.

व यापुढेही असेच काव्य संग्रह लिहून आपल व आपल्या तालुक्या सहित जिल्ह्याचे नाव असच उंचावत रहा अशा मनसे शुभेच्छा उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. तर श्री उपरकर यांनी अक्षता च्या काव्यसंग्रहाचा भरभरून कौतुक करत मनसे पूर्णपणे पाठीशी असल्याची ग्वाही देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेनेचे जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक नंदू परब ग्रा.प सदस्य अक्षय पारसेकर मनोज कांबळी प्रणित तळकर संतोष सावंत विशाल बर्डे दादा पालकर चेतन पारसेकर खेमराज सावंत आदी पदाधिकारी व श्री सुंदर गावडे व त्यांच्या आई उपस्थित उपस्थित होते.