युवा उद्योजक बाबा टोपले 'समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित

Edited by: लवू परब
Published on: August 19, 2025 14:12 PM
views 10  views

दोडामार्ग :  तालुक्यातील भेडशी येथील युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांना जनजागृती सेवा संस्था, बदलापूर यांच्यातर्फे 'समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने आयोजित समारंभात माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री धुमाळे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

युवा उद्योजक बाबा टोपले हे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सहकार, अभिनय आणि क्रीडा क्षेत्रांत सातत्यपूर्ण सक्रीय असतात. त्यांची ही कामगिरी लक्षात घेऊन जनजागृती सेवा संस्था, बदलापूर यांनी त्यांना समाजरत्न पुरस्कारासाठी निवडले. कणकवली येथील ​श्री भवानी सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. 

यावेळी सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा कणकवली नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका राजश्री धुमाळे, सिंधुदुर्ग फाउंडेशनच्या अध्यक्षा अक्षता कांबळी, गोमंतकीय कवयित्री तथा गोवा राज्य समन्वयक शुभांगी गुरव, साईकृपा कन्स्ट्रक्शनचे संस्थापक राजू मानकर, सेवानिवृत्त अधिकारी चंद्रशेखर उपरकर, संस्थाध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

​दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांनी या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली असून भविष्यात सुद्धा सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहणार असे स्पष्ट केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.