
दापोली : 263 दापोली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून ते 7 नोव्हेंबर पर्यंत 9 उमेदवारांनी निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक पुरूषोत्तम कुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी निवडणूक प्रचार खर्चात आघाडी घेतली आहे.
मनसेचे उमेदवार संतोष सोनु अबगुल यांनी 10 हजार 660, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय वसंत कदम यांनी 1 लाख 80 हजार 747, शिवसेनेचे योगेशदादा रामदास कदम यांनी 6 लाख 49 हजार 796, अपक्ष उमेदवार ज्ञानदेव खांबे यांनी 23 हजार 182, संजय संभाजी कदम व संजय सिताराम कदम यांनी प्रत्येकी 10 हजार 995, प्रविण मर्चंडे यांनी 36 हजार 760, कदम योगेश रामदास व कदम योगेश विठ्ठल यांनी प्रत्येकी 11 हजार 500 इतका खर्च केला आहे.
या खर्च तपासणी बैठकीसाठी निवडणुक खर्च निरीक्षक पुरूषोत्तम कुमार, उत्तम सुर्वे, सुनिल जोशी, समीर भाटवडेकर, सहाय्यक खर्च निरीक्षक पवन राठी यांच्यासह 9 उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते.