निलेश राणेंवर बोलण्याची योगेश धुरी यांची पात्रता नाही : दत्तप्रसाद धुरी

Edited by: भरत केसरकर
Published on: January 28, 2024 07:18 AM
views 506  views

कुडाळ : २०२४ ला निलेश राणे यांचा विजय हा पक्का असून त्यांना आमदार होण्यापासून रोखण्याची ताकद उबाठां मध्ये नाही. या वेळी माजी खासदार नीलेश राणे यांना माणगाव खोऱ्या मधून भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मी दत्तप्रसाद धुरी स्वतःहून मैदानात उतरून विशेष प्रयत्न करणार आहे. स्वताची लायकी नसलेले आणी स्वतःला मोठ नेतृत्व समजणारे योगेश धुरी हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. माणगाव  ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतला तिकीट मिळवू शकले नाहीत. तिकीटासाठी धडपड करून सुद्धा विनायक राऊत आणि वैभव नाईक यांनी त्यांचे पंख छाटले. सुरूवातीला जिल्हा पातळीवर पद सांभाळू शकले नाहीत म्हणून युवा जिल्हा सरचिटणीस पदावरून युवा तालुकाप्रमुख पदावर गच्छंती  झाली. या पुढे जर योगेश धुरी यांनी आपली बेताल व्यक्तव्ये बंद नाही केली तर त्यांचा पोलखोल नक्कीच करू असा थेट इशारा दत्तप्रसाद सगुण धुरी  यांनी योगेश धुरी यांना दिला आहे.