आरोग्यदायी जीवनासाठी योग करा : साधना गुरव

Edited by: विनायक गांवस
Published on: January 21, 2025 20:55 PM
views 11  views

सावंतवाडी : योगामध्ये सूर्यनमस्कार प्रकाराला विशेष स्थान असून आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा केला पाहिजे असे आवाहन ओरोस आयुष विभागाच्या योग व निसर्गोपचार तज्ञ साधना गुरव यांनी केले. सूर्यनमस्कार दिनानिमित सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयुष् विभागअंतर्गत मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सूर्यनमस्कार बाबत मार्गदर्शन करतांना साधना गुरव बोलत होत्या.

यावेळी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ धीरज सावंत, डॉ निखिल अवधूत, डॉ. निलेश अटक, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ सागर जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. निलेश अटक यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि दैनंदिन आवश्यकता व मानसिकता याबद्दल बहुमोल माहिती देऊन सूर्यनमस्कार या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित योगसाधकांनी सूर्यनमस्काराच्या १२ आवर्तनाची प्रात्यक्षिके दाखवून सर्वांनी रोज सूर्य नमस्कार करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व विभागाचे इन्चार्ज सिस्टर, प्रयोगशाळा विभागाचे इन्चार्ज आणि कर्मचारी, कार्यालय प्रमुख सौ येळेकर, एन सी डी विभागाच्या सौ. कशाळीकर, आय सी टी सी प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.