
मालवण : योगा हा मानवी जीवनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. योगासनामुळे मानवी जीवन निरोगी आणि दीर्घायुष्य होण्यास अत्यंत मदत होते. सन 2014 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून या दिवशी साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मध्ये कार्यरत असणारे एनसीसीचे 58 बटालियन आणि स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा NCC (राष्ट्रीय छात्र सेना) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी येथे आर्मीच्या नियंत्रणाखाली हा योगा दिन साजरा करण्यात येणार आहे.
योग दिवस साजरा करण्यासाठी भारत सरकारचे आर्मी ऑफिसर कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम आणि इतर आर्मी ऑफिसर उपस्थित राहणार आहेत. हा उपक्रम आर्मीच्या नियंत्रणाखाली घेण्यात येणार आहे तरी या संधीचा मालवण मधील व मालवण परिसरातीलसर्व शाळांचे विद्यार्थी, संस्था पदाधिकारी पत्रकार, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, महिला बचत गट, महिला मंडळ, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, योगा ग्रुप, आपणा सर्वांना 58 महाराष्ट्र बटालियन कर्नल दीपक दयाळ , सिंधुदुर्ग कॉलेज प्राचार्य डॉशिवराम ठाकूर, आणि एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा .डॉ. एम आर. खोत यांच्यावतीने सर्वांना आवाहन करण्यात येते आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, तसेच आंतरराष्ट्रीय योगा दिन भव्य स्वरूपात समुद्र काटाला साजरा करणारे आपले मालवण शहर महाराष्ट्रात आणि देशात एक वेगळ्या पण दाखवणारे ठरवावे, मालवण शहराची एक वेगळी ओळख आपण देशाला करून द्यावी, अशी विनंती या ठिकाणी आम्ही करीत आहोत.
या ठिकाणचे सर्व फोटो दिल्ली या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत, तरी सर्वांनी मोठ्या 21 जून या दिवशी ठीक सकाळी आठ वाजता नवीन मालवण बंदर जेटी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.