कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबिर

Edited by:
Published on: March 02, 2025 21:17 PM
views 592  views

कुडाळ :  पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग  मार्फत कुडाळ शहरामध्ये   *संयुक्त योगोपचार शिबिर* गुरुवार  दिनांक 6 मार्च 2025 ते 10 मार्च 2025  दरम्यान होत आहे.  सकाळी 6:00 ते 7:30  या वेळेत दररोज 5 दिवशीय  शिबिर संपन्न होणार आहे. सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन, ऍडव्हान्स योग, आयुर्वेद  तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग होतील.  या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल.  रविकमल हॉल, कुडाळ  येथे सदर शिबिर होणार आहे.  तरी सर्व योगाभ्यास प्रेमी  पुरुष, महिला तसेच लहान मुलांनी या योगशिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. सदर योग शिबीर निःशुल्क आहे त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा. 

अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर 9823881712, लक्ष्मण पावसकर, विलास परब, राजेंद्र मुळीक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.