
कणकवली : जागतिक योग दिनानिमित्त कणकवली नगरपंचायत, कणकवली व कनकसिंधू शहर स्तर संघ, कणकवली यांच्यावतीने नगरवाचनालय हॉल येथे योग अभ्यास करण्यात आला. "जेथे योग असे, तेथे रोग नसे" हा मंत्र घेत. प्रत्येकाने थोडा वेळ तरी योगा करावा व निरोगी राहावं असा संदेश देत. योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी योग प्रशिक्षक आनंद सावंत यांनी उपस्थित महिलांना योगासनाचे विविधप्रकार दाखविले व आपल्या दैनंदिन जीवनात शरीराला होणारे फायदे सविस्तर सांगितले. यावेळी कार्यक्रमाला कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, योगप्रशिक्षक आनंद सावंत, कनकसिंधू शहर स्तर संघ अध्यक्ष प्रिया सरूडकर, स्वाती राणे व बचत गट महिला उपस्थित होत्या.