
सावंतवाडी : जागतिक योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योग हा व्यायामाचा एक प्रभावशाली प्रकार आहे. ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्याच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते.
कारागृहाच्या आत चार भिंतीमध्ये बंदीजनामध्ये स्वस्थ निरोगी शांततापूर्ण जिवन जगण्यासाठी योग अभ्यासाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनः शांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग त्यानुसार जागतिक योग दिनानिमित्त" जिल्हा विधी सेवा प्राधिरिकरण, ओरोस व तालुका विधी सेवा यांचे संयुक्त विद्यमाने " जीवनविद्या मिशन, उपकेंद्र सावंतवाडी यांचे योग प्रशिक्षक डॉ. निलेश अटक, याचेमार्फत सावंतवाडी जिल्हा कारागृहातील बंदीजनांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला.
या शिबीरात एकूण ३८ जणांनी सहभाग नोंदविला. योग प्रशिक्षक डॉ. निलेश अटक, यांनी विविध योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक संतुलन कसे राखले जाते याबाबत महत्व सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ओरोस व तालुका विधी समिती, सांवतवाडी यांनी आयोजित कलेल्या शिबिराबाबत मान्यवरांचे कारागृह अधिक्षक सतिश कांबळे यांनी आभार व्यक्त केले.