जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने योग दिन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 21, 2025 19:14 PM
views 55  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाअन्वये किमान संयुक्त कार्यक्रमांतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश  तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग हेमंत  गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय संकुल, सिंधुदुर्ग येथे  आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणेत आला.

त्यावेळी  हेमंत  गायकवाड, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग,  व्ही. एस. देशमुख, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग, एस. डी. गुंडेवाडी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग,  ओ.ओ. चेंडके, दिवाणी न्यायाधीश (व स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग,ओ. जी. देशिंगकर, सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग,  आर. व्ही. नडगदल्ली, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग, एस. जे. पाटिल, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग, तसेच लोक अभिरक्षक कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी व जिल्हा न्यायालय संकुलातील प्रबंधक सुकांत सावंत व सर्व कर्मचारी तसेच डॉ. तुळशीराम रावराणे, प्रभारी भारत स्वाभिमान ट्रस्ट सिंधुदुर्ग, योग शिक्षक उपस्थित होते.

डॉ. तुळशीराम रावराणे,  योग शिक्षक, यांनी उपस्थितांना उत्कृष्ट असे योग प्रशिक्षण देवून निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्व पटवून दिले. न्यायालयीन व्यवस्थापक श्री. मालकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.