
कुडाळ : मराठा समाज हॉल कुडाळ येथे योग दिनी सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचलित भगिनी मंडळ बालवाडीतील चिमुकल्यानी योगाभ्यास केला. योग साधका मेधा जुवेकर, अलिषा वेतोरेकर, अनिता परब, निता पिंगुळकर, कळसुलकर, राधिका परब, राजेश कुडाळकर, योगेश पुरोहित, रवींद्र चव्हाण, पिंगुळकर यांनी मुलांना योग साधना कशी करावी हे शिकवले. मुलांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.
शिक्षक भक्ती सावंत, स्मिता घटकर, रिया सावंत, श्रेया सामंत, प्राजक्ता लोखंडे, सीमा परब, मदतनीस नम्रता नाईक, रोहिणी पारकर, श्रुती कुंभार, प्रचिती राणे, आरती कुंभार आदी उपस्थित होत्या.