सिंधुदुर्गला यलो अलर्ट ; कणकवली तहसीलदारांचं सतर्कतेचं आवाहन

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 07, 2023 14:59 PM
views 365  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ,८ व ९ जुलै या कालवधीत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने (यलों अलर्ट) वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहून दक्षता घेण्याचे आवाहन तहसिलदार आर. जे पवार यांनी केले आहे.


या कालावधीत मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे तसेच घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये मोबाईलवर सभाषण करू नये तसेच इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर रहावे अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा तसेच आपतकालीन स्थितीसाठी कणकवली तालुका नियंत्रण कक्ष- ०२३६७ २३२०२५ येथे संपर्क साधावा.


अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते अशावेळी नागरिकांनी सतर्क राहावे आपण पुरप्रवण किंवा दरड प्रवण भागात राहत असल्यास अतिवृष्टीच्या कालावधीत प्रशासनाकडुन मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे. पुराण क्षेत्र व पाणी तंवण्याची ठिकाणी या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याबाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पूल इ. ठिकाणी जावू नये, वाहन चालताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, असे आवाहन कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनी केले आहे