
सावंतवाडी : 2024 वर्षा अखेरच्या अखेरच्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा असं आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने जनतेला केलं आहे. डिसेंबर महिना हा वर्षाचा अखेर महिना असल्याने या महिन्यांमध्ये धावपळ वाढते. महिन्याच्या अखेरचे दिवस मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केले जातात. 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्येच मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. याचं कारण अति उत्साहात घाई गडबड व निष्काळजीपणा आहे. जशी तुमच्या कुटुंबाची काळजी आहे तशीच कुटुंबाला तुमची काळजी आहे याचं भान असणं फार गरजेचं आहे. म्हणूनच स्वतःची काळजी घ्या, वाहने शिस्तीत व काळजीपूर्वक जपून चालवा. आपलं जीवन सुरक्षित ठेवा अस आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत आहे.