यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'ग्रॅज्युएशन सेरेमनी' उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: April 09, 2023 20:04 PM
views 135  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये सिनिअर केजी व इयत्ता पाचवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन सेरेमनी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पदवी पोशाखातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ येथील स्मॉल वंडर प्री-प्रायमरी स्कूलच्या संचालिका श्रीया सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, वायबीआयएस प्राचार्य व्यंकटेश बक्षी व वायबीआयएस किड्सच्या मुख्याध्यापिका उमा झारापकर उपस्थित होत्या.

     विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात प्रत्येक शैक्षणिक टप्प्याचे एक वेगळे महत्त्व असते. नवीन टप्प्यावर प्रवेश करताना मुलांनी पूर्वी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास पुढील आव्हाने स्वीकारण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक वर्गही मोठया प्रमाणावर उपस्थित होता. विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

     प्रमुख पाहुण्या श्रीया सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य व्यंकटेश बक्षी यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित राहिलेल्या पालक वर्गाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका डिसोजा, सोनाली शेट्टी व धनश्री इंदुलकर यांनी केले. आभार प्रदर्शन नेहा म्हाडेश्वर यांनी केले.