यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रवेश सुरू

Edited by: विनायक गावस
Published on: September 06, 2023 15:36 PM
views 91  views

सावंतवाडी : जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम.ए., एम.कॉम., एम.बी.ए., बी.ए., बी.कॉम., बी.लिब., एम.लिब., पत्रकारिता, टेक्निकल  प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षापासून मानसशास्त्र विषयात पदवी घेण्याची  संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रात बी.ए.,बी.कॉम.,एम.ए.,एम.कॉम, रूग्ण सहाय्यक तसेच टेक्निकल  शिक्षणक्रमासाठी प्रवेश सुरू झालेले आहेत. शिक्षणक्रम नोकरी व व्यवसाय, घर सांभाळून पूर्ण होऊ शकतो. एम.ए. शिक्षणक्रमात मराठी,हिंदी,अर्थशास्त्र व लोकप्रशासन हे विषय उपलब्ध करून दिले आहेत. एम.कॉम. शिक्षणक्रमात अॅडव्हान्स अकांऊटींग, बॅकिंग & फायनान्स बिझनेस इंटरप्रेनरशीप व बिझनेस मॅनेजमेंट हे विषय उपलब्ध आहेत. तसेच एम.बी.ए. शिक्षणक्रमात HR,Mkt,Fin हे  विषय उपलब्ध आहेत. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांस प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थीनींसाठी नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी रुग्ण सहायक हा शिक्षणक्रम उपलब्ध केले केलेला आहे. तसेच इलेक्ट्रिशन सारख्या टेक्निकल कोर्ससाठी विशेष मार्गदर्शन विद्यापीठ मार्फत दिले जाणार आहे. तसेच पत्रकार क्षेत्रात करिअर करण्यासाठी डिप्लोमा इन जर्नालिझम त्याच बरोबर बी.लिब. व एम.लिब शिक्षणक्रम उपलब्ध करून दिले आहेत.


बारावी उत्तीर्ण किंवा दहावी + किमान दोन वर्षे मुदतीचा पदविका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष बी.ए./ बी.कॉम. शिक्षणक्रमास प्रवेश मिळेल. शिक्षणक्रम शुल्कातच अध्ययन साहित्य विद्यापीठाकडून पुरविले जाते. मुक्त विद्यापीठाची पदवी ही इतर सर्व मान्यताप्राप्त विद्यापीठांशी समकक्ष आहे. तसेच स्पर्धा परीक्षा ,पदोन्नती व इतर विद्यापीठात देखील शिक्षणक्रम घेण्यासाठी संधी मिळू शकते.विविध शिक्षणक्रमास  प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी  व अधिक माहितीसाठी मुख्य कार्यालयाशी सावंतवाडी डॉ.जे.बी.नाईक  आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज,आरपीडी कॉलेज गेट समोर 8605992334. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर, मोती तलावाजवळ, 7385975209/ 9423301731 कुडाळ संत राऊळ महाराज कॉलेज 9420307271. वेंगुर्ला बॅ. खर्डेकर  महाविद्यालय +919423811905. दोडामार्ग नाम. भाईसाहेब प्रतिष्ठान, दोडामार्ग जुनि. कॉलेज परिसर +919823979493 येथे 

 त्वरीत संपर्क साधावा अस आवाहन केले आहे. प्रवेशाची अंतिम दिनांक 10 सप्टेंबर आहे.