सावंतवाडीत तंत्रशिक्षण विभागाचे समुपदेशन केंद्र सुरु !

Edited by: विनायक गांवस
Published on: June 12, 2024 06:06 AM
views 166  views

सावंतवाडी : राज्यात अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असून राज्य तंत्रशिक्षण विभागातर्फे येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाचे अधिकृत प्रवेश केंद्र क्र.३४७० येथे सुरु असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष प्रवेश याठिकाणी सुरु आहे.

     

चालू शैक्षणिक वर्षी थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेत शासनाने काही बदल केले असून त्यासंबंधीची माहिती या केंद्रावर दिली जाते. या सोबतच विविध प्रकारचे दाखले, शिष्यवृत्ती, ऑनलाइन प्रवेश फेऱ्या याबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये याचीही काळजी घेतली जाते. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख २५ जून असून थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी नोंदणीची अंतिम तारीख ३ जुलै आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुख्य समुपदेशक प्रा.दीपक पाटील ९४०४२७२५६६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तंत्रशिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.