
मंडणगड : यशतेज फाउंडेशन मंडणगड यांच्यावतीने 27 एप्रिल 2025 रोजी मंडणगड येथे भव्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आला. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील स्पर्धक या स्पर्धेस सहभागी झाल्याने स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारोहास फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड यश घोसाळकर गटविकास अधिकारी विशाल जाधव तहसीलदार अक्षय ढाकणे नगरपंचात मुख्याधिकारी अभिजीत कुंभार पोलीस निरिक्षक नितीन गवारे गटशिक्षण अधिकारी नंदलाल शिंदे डॉ. विकास शेटे, ॲड.श्रीकांत जाधव, ॲड. अरुण ढंग, राम राठोड, राजेश इंगळे व दिनेश सापटे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे बुद्धिबळ मुख्य ऑर्बिटर म्हणून विनायक माने, सह ऑर्बिटर म्हणून श्रेया सोनकर आणि कल्पेश लिमये यांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी स्पर्धेचे यशस्वी संचालन केले. स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 127 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या विविध वयोगटांतील विजेते पुढील प्रमाणे आठ वर्षाखालील गट - संभाजी पिंपळे प्रथम, स्वस्तिक पवार व्दितीय , शिवराज काळे तृतिय दहा वर्षाखालील गट- विपुल फडके प्रथम, शिव गवस व्दितीय सानिस बुटाला तृतिय बारा वर्षाखालील गट- समृद्धी खैरे प्रथम, गुरुराज दळवी व्दितीय, साईराज थोरात तृतिय चौदा वर्षाखालील गट- हर्ष चव्हाण प्रथम, युवराज देवघरकर व्दितीय, शौर्य गवस तृतिय सोळा वर्षाखालील गट- वेद कांबळे प्रथम, प्रीत जैन व्दितीय, मयूर गणवे तृतिय क्रमांक मिळवीला. दापोली, खेड व मंडणगड या तीन तालुक्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेत शानदार कामगिरी करत भरघोस यश संपादन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भारताचे ग्रँड मास्टर व इंडिया लेडीज टीमचे कोच श्री अभिजीत कुंटे यांनीदेखील स्वतःहून एक व्हिडिओ बनवून एस एस फाउंडेशनच्या कामगिरीचे अभिनंदन केले तसेच श्री श्रीराम खैरे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी यांनी देखील अभिनंदन स्वतःचा व्हिडिओ पाठवून यशतेज फाउंडेशनचे कौतुक केले आणि यशतेज फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.