
सावंतवाडी : शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा मोती तलाव येथे नारळ अर्पण करण्यात आले नाहीत. नारळी पौर्णिमेला ऐतिहासिक तलावात नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र, आजच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा मानाच्या नारळाचे पूजन सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात करण्यात आले. काहीकाळानंतर हा नारळ तलावात अर्पण केला जाणार आहे.
शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा तलावात नारळ अर्पण करण्यात आले नाहीत. मात्र, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेत खंड पडू नये यासाठी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते या मानाच्या नारळाचे विधीवत पूजन करण्यात आले. ऐतिहासिक राजवाड्यात या सुवर्ण नारळाचे पूजन करण्यात आले. काहीकाळानंतर हा नारळ तलावात अर्पण केला जाणार आहे. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, कृष्णा राऊळ, पुरोहित श्री. सोमण, पोलिस राजा राणे, श्री. जाधव, अमित राऊळ, सचिन कुलकर्णी आदिंसह शहरातील नागरिक, पोलिस उपस्थित होते.