जिल्हा रुग्णालयात जागतिक हृदय दिन कार्यक्रम

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 01, 2024 08:40 AM
views 534  views

सिंधुदुर्गनगरी : मानवी शरीरात हृदय फार महत्वाचे आहे. त्यामध्ये बिघाड झाल्यास मृत्यूही येऊ शकतो. त्यामुळे हृदयासंबंधी कोणतीही समस्या असल्यास तात्काळ उपचार घ्यावेत, तसेच नियमित तपासणी सुरू ठेवावी. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी जागतिक हृदय दिन कार्यक्रमात बोलताना  सांगितले. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे  जागतिक हृदय दिन कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जिल्हा शल्चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, डॉ शाम पाटील,डॉ.चेतना चुबे,समन्वयक केतन कदम, कारनिस अल्मेडा यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील विविध डॉक्टर, कर्मचारी,उपचारसाठी आलेले रुग्ण उपस्थित होते. 

आज जागतिक हृदय दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात, हृदय संबंधित आजार व दिले जाणारे उपचार यासंबंधी माहिती देत जनजागृती करण्यात आली.या एली बोलताना तृप्ती जाधव म्हणाल्या की ,मानवी शरीरात हृदयाला फार महत्त्व आहे. त्यातील बिघाडामुळे उच्च रक्तदाब तसेच हार्ट अटॅक सारख्या समस्या निर्माण होतात, यामुळे मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे हृदयासंबंधी कोणत्याही समस्या असल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत. नियमित औषधोपचार व चांगला आहार घ्यावा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक त्या तपासण्या व वेळीच उपचार घ्यावेत त्यामुळे हृदय रोगाचा धोका टळू शकतो. अशी माहिती यावेळी उपस्थिताना दिली.