
सिंधुदुर्ग : जागतिक एड्स निर्मूलन दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापिठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसर समाजकार्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजकार्य विभागाच्या द्वितीय वर्गातील विद्यार्थ्यांनी एच.आय.व्ही.एड्स या विषयावर सन 2024 च्या Take the rights path: My health, my right!” या थीमनुसार पोस्टरप्रदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगीं उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी ICTC समुपदेशक श्री.सुनील सोन्सुरकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. विशेष अतिथी म्हणून सुप्रिया राऊळ यांची उपस्थिती होती. सिंधुदुर्ग उपपरिसराचे संचालक श्रीपाद वेलींग यांनी मान्यवराचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुनील सोन्सुरकर यांनी एचआयव्ही व एड्स याबाबाबत सविस्तर माहिती देऊन या दिवसाचे महत्त्व सांगितले. तसेच आपल्या कामाच्या अनुभवाच्या आधारावर एचआयव्ही बाधित व्यक्तीबरोबर समाजकार्यकर्ता म्हणून कसे काम करावे याविषयी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी संचालक श्री.श्रीपाद वेलिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. प्रा.माया रहाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थी प्रवीण बासर याने प्रमुख वक्त्याचा परिचय करून दिला.विद्यार्थीनी मानसी मोहिते हिने आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विजय लचके याने केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अमर निर्मळे आणि प्रा. पुनम गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.