
मालवण : मालवण खोतजुवा येथील कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे बुधवारी मालवण दौऱ्यावर होते. भाजपा नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांशी त्यांनी गुप्त बैठक घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी खोतजुवा येथील ग्रामस्थ पराग खोत, सुधीर खोत, शंकर खोत, प्रताप खोत, समीर खोत, रणजित खोत, जितेंद्र खोत, मुरलीधर खोत यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.










