
सावंतवाडी : वीजेचा झटका लागल्यामुळे माडखोल येथील सिमेंट कारखान्यात काम करणारा कामगार जागीच ठार झाला. प्रतीक बच्चुभाई पोकर (वय ३३, रा. कोलगाव-चाफेआळी) असे मृताचे नाव आहे. त्याचा भाऊ शैलेश कुमार पोकार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोटार पंप चालू करून त्यावर पाणी मारत असताना त्याला अचानक विजेचा धक्का लागला. तदनंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.