काम मार्गी | पार्सेकर यांचं उपोषण मागे

Edited by:
Published on: January 25, 2025 16:08 PM
views 281  views

सावंतवाडी : न्हावेली येथील मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याच्या डागडुजी संदर्भात कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालून येत्या काही दिवसात काम करण्याचे आश्वासन दिल्याने तसेच त्वरित ठेकेदारा करवी जेसीबी पाठवून गटार खोदाई करून दिल्याने उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी २६ जानेवारीला उपोषणाचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला आहे.

शिरोडा-सावंतवाडी महामार्गाला लागून न्हावेली माऊली मंदिर कडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जुन 2021 नव्याने करण्यात आला. पाच वर्ष रस्त्याचे दायित्व असतात हा रस्ता वर्षभरानंतर खड्डेमय बनला आहे.या रस्त्याची डागडूजी तसेच गटार अन्य गोष्टींकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने तसेच संबंधित विभागाकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्यात येत असल्याने उपसरपंच श्री पार्सेकर यांनी उपोषण शेंड्याचा इशारा संबंधित विभागाला दिला होता. एकूणच त्यांच्या इशारा नंतर खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाच्या कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांनी तात्काळ उपसरपंच श्री पार्सेकर यांना फोन करून उपोषण न करण्याची विनंती केली रस्त्यावरील पडलेले खड्डे तसेच गटार व झाडी अधिकार येत्या काही दिवसात करून देतो असे ग्वाही दिली. तसेच ठेकेदाराकडे तात्काळ जेसीबी पाठवून गटार खुदा करून दिली श्री चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाअंती श्री पार्सेकर यांनी अखेर 26 जानेवारी रोजी उपोषणाचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता येत्या काही दिवसांनी झाल्यास आपण पुन्हा उपोषणाचा निर्णय घेऊ असा इशाराही श्री पार्सेकर यांनी दिला आहे.