
वेंगुर्ला : विधानसभेची ही निवडणूक सोपी नाही. यामुळे शिवसेना म्हणून आपली संपूर्ण ताकद दिसणं गरजेची आहे. भाजप आपल्या सोबत आहेच. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती निहाय मी गावात गावात जाणार आहे. सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. पुढील आठवड्यात तालुक्यातील प्रत्येक गावात मी पोचणार आहे. आढावा घेणार आहे. मी आता आपल्यात नव्याने सामील झालो आहे. आता आपण सर्व माझे कुटुंब आहात. येणारे २० दिवस आपण फक्त दिपकभाई यांच्यासाठी काम करायचं आहे. गाव पातळीवरील रुसवे, फुगवे बाजूला ठेऊन दिपक केसरकर यांना १ लाख मते देण्यासाठी काम करूया असे आवाहन सावंतवाडी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा संघटक संजू परब यांनी केले.
वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख यांच्याशी शनिवारी (२८ ऑक्टोबर) संजू परब यांनी सप्तसागर अपार्टमेंट येथील शिवसेना कार्यालयाच्या ठिकाणी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते संजू परब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुहास कोळसुलकर यांची उपजिल्हाप्रमुख पदी, सलील नाबर यांची उपतालुकाप्रमुखपदी, रेडी जिल्हा परिषद उपविभाग संघटिका पदी अर्चना नरसुले तर आडेली युवतीसेना शाखाप्रमुख पदी पूजा सोनसुरकर यांची नियुक्ती करण्यात आली. सचिन वालावलकर यांच्या हस्ते यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, विकास योजना समन्वयक सुरज परब, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, महिला उपजिल्हा संघटक शीतल साळगावकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना शहरप्रमुख सागर गावडे, उपतालुकाप्रमुख कौशिक परब, परशुराम परब, विभागप्रमुख दत्ता साळगावकर, संजय परब, अमित गावडे, नयन पेडणेकर, मितेश परब, अण्णा वजराटकर, प्रभाकर गावडे, संतोष परब, युवतीसेना तालुकाप्रमुख योगिता कडुलकर यांच्यासाहित तालुक्यातील शाखाप्रमुख, बुथप्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन वालावलकर म्हणाले की, मंत्री दीपक केसरकर २९ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून वेंगुर्ला तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यानी यासाठी जायचं आहे. आता ही लढाई आपल्याला संपूर्ण ताकद लावून जिंकायची आहे. गेल्या १५ महिन्यात फक्त वेंगुर्ला न प मध्ये सुमारे १०० कोटी रुपये केसरकर यांच्या माध्यमातून आले. तालुक्याचा आकडा यापेक्षा जास्त आहे. यामुळे दीपक केसरकर यांनी विकासकामांसाठी दिलेल्या या कोट्यवधीच्या निधीची परतफेड आपल्याला मतदानातून करायची आहे. असे आवाहन वालावलकर यांनी केले. तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, विभागप्रमुख यांच्यामार्फत वेळोवेळी गावागावात सूचना दिल्या जातील. आपल्या काही अडचणी असतील तर त्या विभागप्रमुखाना सांगायच्या आहे ते तालुका कार्यकारणी पर्यंत पोचवतील व त्याचे निराकरण केले जाईल. दीपक केसरकर यांना वेंगुर्ला तालुक्यातुन जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करूया असेही मांजरेकर यांनी सांगितले.