
कुडाळ : पर्यटनाला चालना देणारा लायन्स महोत्सव सिंधुदुर्गच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान ठरत आहे. आंतरराष्ट्रीय लायन्स या सेवाभावी संस्थेचे सामाजिक कार्य सर्वांसाठी भुषणावह आहे असे प्रतिपादन कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी लायन्स महोत्सवच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी रात्री केले
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या 23 व्या लायन्स फूड फेस्टिवलला कालपासून कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर दिमाखात सुरूवात झाली महोत्सवाचे, उद्घाटन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल प्रथम उप प्रांतपाल लायन. विरेंद्र चिखले लायन सीए, सुनील सौदागर उपाध्यक्ष कोकण रिजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर श्रीकृष्ण परब उपाध्यक्ष वेस्टर्न रिजन महाराष्ट्र रमाकांत मालू लक्ष्मी ज्वेलर्सचें राहुल पाटणकर, राजू पाटणकर अँड अजित भणगे अँड श्रीनिवास नाईक लायन सेवा संकुल अध्यक्ष ऍड अमोल सामंत लायन्स क्लब कुडाळ प्रेसिडेंट चंद्रशेखर पुनाळेकर लायन फेस्टिवल चेअरमन गणेश म्हाडदळकर आनंद बांदिवडेकर सीए सागर तेली,ऍड समीर कुळकर्णी मंदार शिरसाट लायन्स, रोटरी क्लबचे पदाधिकारी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर रसिकवर्ग उपस्थित होता.
यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले लायन या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे कार्य 210 देशात चालत आहे समाजात वावरताना आपण समाजाचे देणे लागतो ही सामाजिक जाणीव ठेवून लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग काम करत आहे आजच्या सोहळ्यात विविध उत्पादित मालाला बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने विविध स्टॉल सहभागी झाले आहेत तसेच ऑटो इंडस्ट्रीज स्टॉलचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे हे निश्चितच व्यवसायवृध्दीसाठी कौतुकास्पद आहे
उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले यांनी लायन्स क्लब कुडाळसिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेने असे महोत्सव घेऊन शतकाकडे वाटचाल करावी अशा शुभेच्छा दिल्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक चळवळीचे केंद्र आहे आणि अशा जिल्ह्यात लायन्स क्लबने समाजसेवा करतानाच असे महोत्सव घेऊन सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी कटिबद्ध झालेले दिसून येत आहेत असे सांगून शुभेच्छा दिल्या उद्योजक श्री परब यांनी लायन्सचे सेवाभावी कार्य अवर्णनीय असल्याचे सांगून बंद पडलेला चिपी विमानतळ सुरू झाला पाहिजे यासाठी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले अँड भणगे यांनी गोवा राज्य पर्यटन दृष्ट्या अनेक उपक्रम राबवत आहेत असाच उपक्रम आपल्या सिंधुदुर्गात केला पाहिजे हा उदात्त दूरदृष्टीकोन ठेवून तेवीस वर्षांपूर्वी लायन्स महोत्सवाला सुरुवात झाली असे सांगितले सीए सुनील सौदागर अँड अमोल सामंत यांनी सुद्धा लायन्सच्या कार्याचा धावता आढावा घेतला या महोत्सवात सिंधुदुर्ग सह पुणे मुंबई सांगली कोल्हापूर या भागातील विविध खाद्य ऑटो इंडस्ट्रियल स्टॉल सहभागी झाले आहेत यावेळी सांगली येथील उद्योजक रमाकांत मालू यांच्या समृद्धी स्टॉलला आमदार निलेश राणे सह सर्व मान्यवरांनी भेट देऊन इतरही स्टॉलची पाहणी केली ऑटो एक्सपो मध्ये नवीन लॉन्चिंग झालेल्या गाडीचे उद्घाटन आमदार राणे यांनी केले यावेळी दोन गरजूंना आरोग्य उपक्रमातर्गत सस्थेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली या महोत्सवाची सुरुवात लायन्स पदाधिकारी डॉ विवेक पाटणकर यानी गणेश वंदनाने केली ईशस्तवन लायन्स पदाधिकारी शोभा माने यांनी सादर केले आभार लायन्स पदाधिकारी सीए सागर तेली यांनी मानले वंदे मातरम या राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली.