कणकवलीत बॉक्सेल ब्रिज च्या कामाला पुन्हा सुरुवात

सर्विस रस्त्याची प्रलंबित कामे मार्गी लावा नंतरच काम सुरू करा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला होता इशारा
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 21, 2022 14:46 PM
views 466  views

कणकवली : कणकवली शहरातील उड्डाणकुलाच्या बॉक्सेल ब्रिज च्या एसएमएस स्कूल समोरील निकृष्ट झालेल्या कामाची दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदाराने पुन्हा हाती घेतले आहे.या आधीही हे काम हाती घेण्यात आले होते.त्यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर लनावडे यांनी नगरपंचायतीची असलेली जुनी पाईपलाईन अनेकदा फोडून ती पाईपलाईन सर्विस रस्त्याखाली घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय करणाऱ्या लोकांना नगरपंचायत कडून पाणीपुरवठा करणे अडचणीचे होत आहे. ही नव्याने पाईपलाईन घालून देण्याबाबत आश्वासन देऊन देखील ठेकेदार कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत. वारंवार सूचना केल्या तरी त्याची दुरुस्ती केली जात नाही. गटारांची कामे अर्धवट व काही ठिकाणी कोसळलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत कणकवली शहरातील जनतेच्या सोयीची कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत बॉक्सेल ब्रिज चे काम सुरू देणार नाही असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी होता. त्यामुळे काही दिवसांसाठी हे काम बंद करण्यात आले होते.पण आता पुन्हा हे काम सुरु करण्यात आले आहे.

तसेच आर ओ डब्ल्यू पासून ठरलेल्या अंतरावर काही बाधित झालेल्या बिल्डिंग देखील पुनर्बांधणी करून त्यातील गाळे भाड्याने देण्यात आले आहेत त्याचे आता काय होणार.

अशा सर्व प्रलंबित प्रश्नांची उत्तरे महामार्ग प्राधिकरणाने दिली नाहीत त्यामुळे शहरवासीयांची अनेक कामे प्रलंबित असताना ठेकेदार आपले काम पूर्ण करण्याची घाई का करतो आहे.असा प्रश्न उपस्थित केला जात आहे