जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करा : अर्चना घारे - परब

Edited by: विनायक गांवस
Published on: July 29, 2024 12:39 PM
views 98  views

सावंतवाडी : सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करा असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कोकण प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे - परब यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ समन्वयकपदी राजू भगत तर तळवडे गाव अध्यक्षपदी राजेंद्र परब यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

नवनियुक्त पदाधिकारी राजू भगत हे शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.  शरदचंद्र पवार यांच्या राजकीय प्रवासात आपण कायमच बरोबर राहिलो आहोत आणि यापुढेही कायम बरोबर राहू. शरद पवार यांचे पुरोगामी विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू." अशा प्रकारच्या भावना यावेळी राजू भगत यांनी व्यक्त केल्या. निवडीबद्दल राजु भगत व राजेंद्र परब यांचे सौ. अर्चना घारे - परब यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे - परब, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस, काशिनाथ दुबाशी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, राकेश नेवगी, मारिता फर्नांडिस, राजू भगत, राजेंद्र परब यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते बांधव उपस्थित होते.