
वेंगुर्ला : आपल्या भागात काजू व काथ्या व्यावसायांना प्रोत्साहन दिलेले आहेत. त्यातून अनेक महिलांनी आपला रोजगार निर्माण केलेला आहे. स्थानिकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न आहेत. या भागातील जनतेने सूचविलेली विकासकामे सर्रासपणे झालेली आहेत. आपल्या भागात परिपूर्ण विकास साधण्यासाठी तुम्हीच येत्या आठ दिवसांत घरोघरी जाऊन विकासकामांची माहिती मतदारांना द्या. येणारे आठ दहा दिवस माझ्यासाठी काम करा असे आवाहन महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी तुळस येथील उत्सव सभागृहात आयोजित गावभेट कार्यक्रमात उपस्थितांना दिली.
शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतर्फे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ तुळस व आडेली जिल्हा परिषद मतदार संघातील गावात केसरकर यांनी रविवारी (१० नोव्हेंबर) गावभेट दौरा केला. यावेळी भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जि. प. चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती विष्णुदास उर्फ दादा कुबल, माजी जि. प. सदस्य नितीन शिरोडकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सुहास कोळसुलकर, तुळस सरपंच रश्मी परब, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, भाजपचे सुधीर झांटये, भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, तुळस उपसरपंच सचिन नाईक, भाजपाचे अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पेडणेकर, तुळस विभाग प्रमुख संजय परब, भूषण आंगचेकर, भाजप युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, शिवसेना तालुका संघटक बाळा दळवी, सेनेच्या तालुका महिला संघटक दिशा शेटकर, उपतालुकाप्रमुख देवा कांबळी, सोसायटी चेअरमन मकरंद परब, भाजप गाव अध्यक्ष सुधाकर परब, मातोंड ग्रामपंचायत सदस्या किशोरी परब, सुजाता सावंत, आर्या रेडकर, सोसायटी संचालक दीपाली परब, रामदास रेडकर, वासु कोंडये आदी उपस्थित होते.
विकासाची क्रीडा निरंतर राहण्यासाठी धनुष्यबाणाला मत द्या : सचिन वालावलकर
राज्यातील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात झालेल्या कामांत आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणांत करोडो रुपयांची कामे दीपकभाईंनी केलेली आहेत.। चांदा ते बांदा व सिंधुरत्न योजनेतून तळगाळातील सर्वसामान्य जनतेला घरबसल्या करता येणारे व्यवसाय ७५ टक्के सबसिडीच्या माध्यमातून केसरकर यांच्या पं -यत्नामुळे मिळालेले आहेत. युवक, महिला, मच्छीमार, शेतकरी व महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. विकासाची क्रीडा निरंतर राहण्यासाठी धनुष्यबाणाला मत देण्याचा संकल्प करूया असे यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर म्हणाले.
केसरकर यांच्या विजयाची राज्याला गरज : सुजाता पडवळ
आपसातील वाद किंवा कुरघोड्या काही दिवस बाजूला ठेवूया. आज एकदिलाने काम करण्याची गरज आहे. केसरकर यांच्या विजयाची राज्याला गरज आहे. लोकसभेपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून येथे महायुतीचा दबदबा निर्माण करूया असे भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ यांनी सांगितले.
हक्काच्या माणसालाच विधानसभेवर जाण्याचा हक्क : सुनील डुबळे
केसरकर हे आमदार व मंत्री झाले तरी सर्वसामान्यांना थेट भेटतात. त्यांची अपाईमेंट घेण्याची गरज नाही. त्यामुळे ते रस्त्याने सुद्धा गाडीतून जाताना सर्वसामान्य गरीब माणसाने त्यांना हात दाखविला तरी ते थांबतात अन त्यांची चौकशी करतात. कोणावरही नैसर्गिक आपत्ती ओढावली तरी त्याला तात्काळ आर्थिक मदतीसाठी ते धावून जातात. अशा आपल्या हक्काच्या माणसालाच विधानसभेवर जाण्याचा हक्क आहे असे शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे यांनी सांगितले.
गेली १५ वर्षे मी सतत काम करत आहे. कोट्यवधीचा निधी आणला, असंख्य विकासकामे पूर्णत्वास नेली आहेत. तरिही विरोधक काही केले नाहीच्या आरोळ्या ठोकत आहेत. यावरून ते स्वतःला स्वतःच खोटारडे ठरवत आहेत. या भागातील जनतेशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माझे सर्व काम जनतेसमोर आहे. त्यांना ते माहित आहे, म्हणूनच मतदारांचे माझ्यावरील प्रेम कधी कमी झालेले नाही. निवडणूक फक्त निमित्त आहे. माझा मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे. मी माझ्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेतोय. त्यामुळे मला खात्री आहे यावेळचा माझा विजय भव्य दिव्य असेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मातोंड येथे व्यक्त केला. मातोंड ग्रामपंचायत नजीकच्या मातोंड सोसायटीच्या देव रवळनाथ सभागृहात आयोजित केलेल्या गावभेट कार्यक्रमात त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी आमदार या नात्याने दीपक केसरकर यांनी गेल्या पाच वर्षात तुळस पंचक्रोशीतील गावासाठी कोणकोणत्या कामांसाठी किती व कसा निधी दिला याचा आढावाच घेतला. हा भाग आंबा बागायती व शेतीसाठी ओळखला जात असल्याने या गावात कृषी पर्यटनाची संकल्पना राबविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनीच दीपक केसरकर यांच्या सर्वांत मोठ्या ऐतिहासिक विजयात सहभागी होण्याची गरज आहे. आपले पवित्र मत एक नंबरवर असलेल्या धनुष्यबाणाला घालून त्यांना पुन्हा एकदा मतदारसंघाची सेवा करण्याची सेवा देवूया, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचा सदस्य या नात्याने आपण या भागाशी जोडला गेलो आहे. आपल्या कार्यकाळात महायुतीच्या माध्यमातून केसरकर यांच्यामुळेच आपण अनेक विकासकामे मातोंड, पेंडूर, होडावडे आदी भागात करू शकलो. विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आपल्याला लाभले आहे, याचा आम्हाला गर्व असला पाहिजे. भाई नेहमीच सर्वांचे आवडते आहेत. विरोधकांच्या आरोळ्यांचे फुसके बार जनतेमध्ये हशा पिकवत आहेत. आपणही या हशाचा आनंद उठवत केसरकर यांना विजयी होण्यासाठी कंबर कसूया, असे ते म्हणाले.