आधी काम मग मतदान

बॅनर ठरतोय लक्षवेधी
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 05, 2024 11:44 AM
views 238  views

देवगड : दोन्ही पक्षांच्या राजकारणात विकासकामांचे नुकसान झाले अशी नाराजी लोकाच्या माध्यमातुन व्यक्त करीत देवगड मधील साईनाथवाडी व पवनचक्की ग्रामस्थांनी बाजारपेठ हनुमानमंदीरानजीक नोटा चिन्हासहीत लावलेला पहिल काम…मग मतदान! हा बॅनर ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणुक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी व राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरला आहे.तीन दिवसांवर मतदान येवुन ठेपले असतानाच जिल्ह्यात अन्य तालुक्यात सुध्या विकासकामांवरून ग्रामस्थांनी उठाव करून लावलेले बॅनर तशाचप्रकारे देवगडमध्ये लावलेलाही बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार शीगेला पोहचला असतानाच दुसरीकडे देवगडमधील पवनचक्की व साईनाथवाडी ग्रामस्थांनी आधी काम, मग मतदान असा लावलेला बॅनर लक्ष वेधून घेत आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या तीन दिवसांवर येवून ठेपले आहे.निवडणुकीचा प्रचार शीगेला पोहचला असून प्रचारसभांनी वातावरण तापले आहे.रविवारपासुन प्रचार थंडावणार आहे.निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच देवगड न.पं.क्षेत्रातील साईनाथवाडी व पवनचक्की भागातील ग्रामस्थांनी आधी काम, मग मतदान नोटा चिन्ह असलेला बॅनर देवगड बाजारपेठ हनुमान मंदीराजवळील रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाजवळ लावला आहे.हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.याबाबत तेथिल ग्रामस्थांशी संवाद साधला असता त्यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या राजकारणात विकासकामे अडकली.एकाने काम मंजुर करायचे व दुस-याने ते रद्द करायचे हे राजकारण आमच्या विकासासाठी घातक ठरले असून यामुळे दोन्ही वाड्यांचे नुकसान झाले आहे.देवगडमध्ये असेच प्रकार राजकीय पक्षांकडून होत असून यामुळे मतदारांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभुमीवर हा बॅनर उद्विग्न होवून लावण्यात आला आहे असे ग्रामस्थांनी सांगीतले.