बौद्ध महासंघ सावंतवाडीची महिला कार्यकारिणी जाहीर

Edited by: विनायक गांवस
Published on: September 13, 2025 13:22 PM
views 178  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाच्या सावंतवाडी शाखेने नुकतीच नवीन महिला कार्यकारिणीची निवड जाहीर केली आहे. महासंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीला हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचा मुख्य उद्देश महिलांना सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा होता.


नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी प्रज्ञा टिळाजी जाधव (माजगगाव) यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी आयु. समृद्धी सचिन जाधव (चौकुळ) आणि सचिवपदी आयु. अन्विता अभय जाधव (चौकुळ) यांची निवड झाली. खजिनदारपदी आयु. सान्वी संजोग जाधव (चौकुळ) यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या सदस्यपदी आयु. नीलिमा नारायण आरोंदेकर (माजगगाव), आयु. श्रद्धा सुधाकांत जाधव (सातार्डा), आयु. मयुरी लाडू जाधव (कोलगाव), आयु. सुष्मिता शिवाजी जाधव (आरोंदा), आयु. हर्षना विनायक जाधव (कोलगाव), आयु. रेश्मा ओंकार कासकर (नेमळे), आयु. सौम्या समीर जाधव (चौकुळ), आयु. गौतमी गोविंद जाधव (माजगगाव) यांचा समावेश आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ सल्लागार आयु. नारायण आरोंदेकर व आयु. वासुदेव जाधव हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष अमित जाधव, सचिव टिळाजी जाधव, खजिनदार विनायक जाधव आणि इतर मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ज्येष्ठ सल्लागार आयु. आरोंदेकर यांनी समाजातील महिलांच्या वाढत्या मागण्यांवर जोर दिला. ते म्हणाले की, महिलांनी संघटित होऊन सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रभावीपणे काम करावे. कार्यक्रमाचा समारोप करताना, प्रास्ताविक उपाअध्यक्ष अमित जाधव यांनी केले, तर आभारप्रदर्शन सदस्य संजोग जाधव यांनी केले. ही नवीन कार्यकारिणी पुढील तीन वर्षांसाठी कार्यरत असेल आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.