
सावंतवाडी : वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटरस्टडीज अँड रिसर्च येथे ८ मार्चला सकाळी १० ते १२ यावेळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला उद्योजिका अन्नपूर्णा कोरगांवकर व आर.पी.डी ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन वुमन्स कॉलेज सावंतवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.