वुमन्स कॉलेज ऑफ कंम्प्युटर स्टडीज & रिसर्च आता RPD कॅम्पसमध्ये !

BCA व MCA कोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू ; मुलींसह आता मुलांनाही सुवर्णसंधी !
Edited by: विनायक गांवस
Published on: June 03, 2023 10:58 AM
views 109  views

सावंतवाडी : रघुनाथ मार्केटनजीकचे सेंटर फॉर इज्युकेशन, टेक्नोलॉजी ॲण्ड हेल्थ, सावंतवाडी 'वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज ॲण्ड रिसर्च, सावंतवाडी' आता राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. BCA (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ) आणि MCA (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ) या दोन कोर्समध्ये अनुभवी व नामांकित संस्थेत माफक फी मध्ये शासनमान्य युनिव्हर्सिटीची डिग्री मिळविण्याची सुवर्णसंधी वुमन्स कॉलेजच्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. दूरस्थ External सुद्धा देखील सुरु केले आहे. आरपीडीच्या प्रशस्त जागेत वुमन्स कॉलेजचा कारभार चालविला जाणार आहे. BCA व MCA अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख संतोष सावंत यांनी केल आहे. 


वुमन्स कॉलेज गेली काही वर्षे 

रघुनाथ मार्केट नजिक कार्यान्वित होते. दरम्यान, या दोन्ही अभ्यासक्रमांच शिक्षण घेणाऱ्या मुलांना दर्जेदार सोईसुविधा, क्लास रुम, अद्ययावत कम्प्युटर लॅब उपलब्ध व्हावी यासाठी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सुसज्ज कॅम्पसमध्ये वुमन्स कॉलेजचे स्थलांतर करण्यात आल आहे. अद्ययावत कॉम्प्युटर लॅब, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, शैक्षणिक कर्ज सुविधा,वसतिगृहाची सोय ही या कॉलेजची खास वैशिष्ट्ये असून आता दूरस्थ External सुद्धा सुरु केले आहे. ऑन जाॅब अथवा "शिका आणि कमवा" या पद्धतीने विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींनासुद्धा शिक्षणासोबतच पार्ट टाईम जाॅबही करता येणार आहे. BCA व MCA साठी प्रवेश पात्रता १२ वी / पदवी (कोणतीही शाखा) आहे. मुलींसह मुलांनाही हा कोर्स आता करता येणार आहे. संगणकीय व्यावसायिक पद्धतीचे तंत्रज्ञान प्रणाली साॅफ्टवेअर स्तरीय पदवी-Graduation व पदव्युत्तर Post- Graduation शिक्षण इथे उपलब्ध आहे. BCA, B.sc IT/CS असतील तर त्यांना MCA कोर्स करता येणार आहे. भविष्याचा वेध घेऊन व्यक्तिमत्व विकास उपक्रम व कॅम्पस व प्लेसमेंटद्वारे अधिकच्या खात्रीशीर नोकरी-व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी नगरपालिकेसमोरील RPD कॉलेजमध्ये सुरू झालेल्या वुमन्स कॉलेजमध्ये भेट देत आपला प्रवेश आजच निश्चित करावा असं आवाहन अध्यक्ष संतोष सावंत यांनी केल आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 02363-271120,9371821120,9422434948,9423216416 साधावा.