वुमेन्स बी.सी.ए. काॅलेजमध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात

नारीशक्तीचा केला सन्मान
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 10, 2023 16:57 PM
views 150  views

सावंतवाडी : वुमेन्स बी.सी.ए. काॅलेज सावंतवाडी येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सेंटर फाॅर एज्युकेशन टेक्नाॅलाॅजी अॅण्ड हेल्थच्या सचिव सौ. समिधा संतोष सावंत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले होते.महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. तन्वी राऊत हिने सादर केलेल्या श्रीगणेशवंदना भरतनाट्यम् ना कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षा, डाॅ. विनया बाड व उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. रोहिणी सोळंके, संस्थेच्या सचिव सौ. समिधा सावंत, ज्येष्ठ सल्लागार काकासाहेब मांजरेकर, प्राचार्या सौ. मीनाक्षी पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.


मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.संस्था सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. समिधा सावंत यांनी प्रमुख पाहुणे रोटरी क्लब सावंतवाडी अध्यक्षा डाॅ. बाड, आहारतज्ज्ञ, यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार केला.

तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी डाॅ. सोळंके  यांचा ज्येष्ठ सल्लागार काकासाहेब मांजरेकर व काॅलेजच्या प्राचार्या सौ. मीनाक्षी पाटील व अन्य प्राध्यापकवर्ग यांचे हस्ते करण्यात आला. तसेच निमंत्रित उपक्रमशील शिक्षिका सौ.पूजा गावडे- व्ही.के.तोरसकर ज्युनि. काॅलेज बांदा, सौ. प्रियदर्शनी म्हाडगुत -बा.म.गोगटे ज्युनि. काॅलेज शिरोडा, सौ. वीणा दिक्षित -बॅ.खर्डेकर ज्युनि. काॅलेज वेंगुर्ले, सौ. माया नाईक - राणी पार्वतीदेवी ज्युनि. काॅलेज सावंतवाडी, सौ. दिपाली गावडे -चौकुळ ज्युनि. काॅलेज, सौ.अनिता सडवेलकर -मिलाग्रीज हायस्कूल सावंतवाडी, यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कलाआविष्कार सिंधुदुर्गच्या, गायिका कु. गौरांगी सावंत यांचाही सत्कार तसेच वुमेन्स बी.सी.ए. काॅलेजच्या वर्षभरातील विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थीनी कु. स्नेहा राऊळ, सोनाली जाधव, सायली दळवी, अब्शार शेख, अलिशा खलील, आसिया सागांवकर, वृषाली राऊळ, टी.वाय.वर्गप्रतिनिधी कु. मयुरी सावंत, एस्. वाय. वर्गप्रतिनिधी कु. कृतिका झांट्ये, एफ. वाय. वर्गप्रतिनिधी कु. लावण्या नाईक, तसेच सन 2021-22 प्रथम क्रमांकाने बीसीए उत्तीर्ण कु. दिव्या बर्डे, यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ. पाटील यांनी केले.तसेच प्रमुख अतिथी डाॅ. बाड यांनी विद्यार्थीनींना योग्य आहारविषयक व सद्यसामाजिक स्थितीविषयी मौलिक मार्गदर्शन केले. काॅलेजच्या व्यक्तिमत्व विकास उपक्रमाचे समन्वयक. ब्रिजेश तळवडेकर यांनी विद्यार्थीनींना जेंडर ईक्वॅलिटी व यशाची भविष्यातील संधी याविषयी मार्गदर्शन केले.तसेच निमंत्रित सत्कारमूर्तींनी विद्यार्थीनींना भविष्यकालीन यशासाठी अतिशय मौलिक असे मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कृतिका झांट्ये व सायली रेडकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका समीक्षा तिवरेकर यांनी केले. या कार्यक्रमाला पत्रकार, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी, तसेच हितचिंतक आदींचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे कलंबिस्त गावचे सुपुत्र शहीद जवान वासुदेव रामा सावंत यांचे स्मरणार्थ त्याची पत्नी गं.भा. राजश्री वासुदेव सावंत यांचाही सत्कार करण्यात आला.