केसरकरांच्या मनातील 'महिला' वेगळी : प्रविण भोसले

Edited by: विनायक गावस
Published on: June 07, 2023 19:40 PM
views 177  views

सावंतवाडी : आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब या उमेदवार असतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू, तिनं पैकी एक जागा राष्ट्रवादीला द्यावी अशी आमची मागणी आहे असं मत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केले. तर दीपक केसरकर यांनी भविष्यातील आमदार ही महिला असेल असं विधान केलं होतं. यावर भाष्य करताना प्रविण भोसले म्हणाले, केसरकरांच्या मनातील महिला ही वेगळी आहे. निवडणूकच्या वेळी ती समोर येईल, तर तीच महिला असावी अस विधान त्यांनी केलं. 


यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर,  महिला जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार सौ दर्शना बाबर देसाई,  चराठा ग्रामपंचायत सदस्य सौ गौरी गावडे, महिला शहराध्यक्ष अँड.सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी,  अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, सौ. मारीता फर्नांडिस,सौ पूजा दळवी आदी उपस्थित होते.