
कणकवली : तळेरे बाजारपेठ येथे खरेदी करताना सौ. वैशाली संतोष घाडी (४७, मूळ फणसगांव - गावठणवाडी, ता. देवगड व सध्या रा. सांताक्रूझ पूर्व - मुंबई) यांची पर्स अज्ञात चोरट्याने चोरली. पर्समध्ये ३ लाख १५ हजार रुपये किंमतीचे, साडेचार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ हजार रुपयांची सोन्याची नथ, ८ हजार रुपये रोकड मिळून ३ लाख२८ हजार रुपयांचा मुद्देमाल होता, जो चोरीस गेला.
वैशाली या पती संतोष यांच्यासमवेत एका खासगी कारने मुंबडूतून सोमवारी दुपारी १.४५ वा. सुमारास तळेरे येथे पोहोचल्या. त्यांच्याकडील पर्समध्ये वरील चोरीस गेलेला मुद्देमाल होता. सदर पर्स त्यांनी खांद्याला अडकविलेल्या बॅगेमध्ये ठेवली होती. बाजारपेठेत विविध खरेदी केल्यानंतर पती - पत्नी दुपारी २.३० वा. सुमारास फणसगांवला जाणाऱ्या बसमध्ये बसले. दुपारी ३ वा. घरी पोहोचलेल्या वैशाली यांनी पाहीले असता बॅगेमध्ये पर्स नव्हती. अखेर वैशाली यांनी कणकवली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.