
सावंतवाडी : सावंतवाडीतील शहरातील एका भागात दुपारच्या दरम्यान 34 वर्षीय महिलेने पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तिचा दीड वर्षापूर्वी घटस्फोट झाला असून तिच्यावर सुमारे काही दिवसापासून डॉ .रुपेश धुरी यांजकडे उपचार चालू होते. सावंतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनास्थळी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, हवालदार मनोज राऊत व अनिल धुरी यांनी भेट दिली. पुढील कार्यवाही महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक या करीत आहेत.










