LIVE UPDATES

सेवानिवृत्त शिक्षक शरद नारकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव..!

Edited by:
Published on: September 30, 2024 05:41 AM
views 430  views

वैभववाडी : तालुक्यातील भुईबावडा गावचे सुपुत्र व प्राथमिक शिक्षक शरद नारकर यांचा आज सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा संपन्न झाला.राज्यभरातून आलेल्या मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गेली ३९वर्षे शिक्षण क्षेत्रात अविरतपणे कार्य करणाऱ्या श्री.नारकर गुरुजी यांचा सेवा निवृत्तपर सत्कार  सोहळा एडगाव येथील सुमित्रा मंगल कार्यालयात संपन्न झाला.राज्यभरातून अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे,  माजी जि प वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे , उद्योजक सुनील नारकर,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, शांताराम देसाई, माजी सभापती श्रीपद मांजरेकर, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, देवानंद पालांडे ,हुसेन लांजेकर, संभाजी खाडे, प्रवीण मापनकर ,दत्तगुरु गावकर, अँड. मटकर, रत्नागिरी जि.प.माजी समाज कल्याण सभापती  परशुराम कदम, मनोज कुलकर्णी तानाजी कदम, विजय केळकर,  डॉ.सी एस काकडे, मनोज पवार ,नरेंद्र मोरे प्रकाश साळुंखे स्नेहलता चोरगे, वीरेंद्र मोरे परशुराम इस्वलकर , शिवराज नारकर, विद्या शिरोडकर, डॉ. शरद जाधव, शिल्पा जाधव, प्रमोद कामत, मनोहर मोरे यासह जिल्ह्यातील शिक्षक वृंद ,शरद नारकर गुरुजी प्रेमी तसेच त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते 

त्यावेळी सत्कारमूर्ती शरद नारकर मनोगतातून म्हणाले की ,मी माझ्या ३९ वर्षाच्या शिक्षकी सेवेत माणुसकी धर्म पाळूनच काम केले.त्यामुळेच आज एवढा जनसमुदाय मला शुभेच्छा देण्यासाठी जमलाय.हीच माझ्या कामाची पोचपावती आहे.आतापर्यंतच्या जीवनात अनेक सुखदुःख आले.या सा-यात मला माझ्या मित्र परीवाराने साथ दिली.त्यांच्यामुळेच मी माझ्या क्षेत्रात यशस्वी काम करू शकलो असे सांगत श्री यांनी सा-यांचे ऋण व्यक्त केलेत. 

सदानंद रावराणे यांनी मनोगत व्यक्त करताना श्री नारकर यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला.शिक्षण क्षेत्राला ख-या पद्धतीने न्याय देण्याच काम श्री नारकर यांनी केले.ज्या ज्या शाळेत त्यांनी सेवा बजावली त्या शाळांचं त्यांनी नंदनवन केले.शिक्षणपासून वंचित राहणा-या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी नारकर यांनी काम केले.त्यांच्या कामाचा आदर्श इतर शिक्षकांनी घ्यावा असे आवाहन श्री रावराणे यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री.नारकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.