कोकणचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार : नारायण राणे

Edited by: कृष्णा ढोलम - श्रीधर साळुंखे
Published on: April 26, 2024 11:20 AM
views 171  views

राजापूर : राजापूर येथील भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राजापूर येथे सभा सुरु आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी कोकण सुखी समृद्ध करणार. इथल्या तरुणांना इथेच रोजगार देण्यासाठी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला साथ द्या असे आवाहन केंद्रीयमंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी राजापूर येथील सभेत केले.

नारायण राणे पुढे म्हणाले, 7 तारिखला होणारी निवडणूक कोकणासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी महत्वाची आहे. विकसित देश बनविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची. मागील दहा वर्षात मोदींनी भारताचे नाव जगात निर्माण केले. अर्थव्यवस्थेत आपला भारत पाचव्या क्रमांकावर आणला. गतिमानरित्या देशाची प्रगती केली. कोरोना काळात अनेक उद्योग बंद झाले होते. घरात अन्न नव्हते. त्यावेळी मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्यांसाठी शौचालय निर्माण केले. जनतेला पाण्याची व्यवस्था केली. आयुष्यमान भारत योजना आणली. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसं जमा केले. अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणल्या. मुंबईत नोकऱ्या राहिल्या नाहीत. कोकणात उद्योगधंदे यावेत, इथल्या तरुणांना इथेच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार. इथले दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार. कोकण सुखी समृद्धी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे राणे म्हणाले.