
सावंतवाडी : रक्त पिशवीच्या दरात झालेल्या दरवाढी विरोधात प्रशासनाला निवेदन देऊन देखील दरवाढ रद्द न केल्यानं आज युवा रक्तदाता संघटनेच्यावतीनं रक्ताच आंदोलन करण्यात येणार होत. परंतु, पोलिसांनी नोटिस बजावत मनाई आदेश असल्यानं आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हंटल्याने यात सहभागी तरूणांच्या भवितव्याचा विचार करून तुर्तास हे आंदोलन स्थगित करत आहोत. मनाई आदेश संपेपर्यंत दरवाढ रद्द न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन जिल्ह्यात छेडलं जाईल याची नोंद राज्य सरकारनं घ्यावी, अन्यथा रूग्णांना लागणाऱ्या रक्तपुरवठा करण्याची जबाबदारी घ्यावी असा इशारा देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
रक्ताला कोणता धर्म, जात, रंग, पंथ नसतो. सर्वसामान्यांप्रमाणे पोलिसांनाही रक्त लागत तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही लागत. मानवी जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे रक्त आहे. रक्ताबाबत राज्य सरकार संवेदनशील नसेल व दरवाढ कमी करत नसेल तर हे सरकार असंवेदनशील सरकार आहे असं म्हणावं लागेल. ही दरवाढ रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी, राज्य शासनाचे मंत्री यांना निवेदन दिली होती. त्यावर कोणतीही निर्णय न झाल्यान आज आम्ही रक्ताच आंदोलन छेडणार असल्याच जाहीर केले होते. त्यानंतर आम्हाला पोलिसांनी नोटिस बजावली आहे. मनाई आदेश असल्यानं आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हंटल आहे. या आंदोलनात युवक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याने त्यांच्या भवितव्याचा विचार करून तुर्तास हे आंदोलन स्थगित करत आहोत. लोकशाहीच्या मार्गाने रक्तदान करत अन्याया विरूद्ध शांततेच्या मार्गाने आवाज उठवण हा गुन्हा ठरत असेल तर यापुढे लोकशाही मार्गाने दाद मागायची की नाही ?हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर यापुढे रक्तदान शिबीर सुद्धा घ्यावी की न घ्यावीत की त्याचीही जबाबदारी पोलिस व जिल्हा प्रशासन घेणार आहेत ? नोटीसा बजावण्यात तत्पर प्रशासनाने सर्वसामान्यांची जबाबदारी घेत ही दरवाढ रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासनाचा मान ठेवून आज हे आंदोलन तुर्तास स्थगित करत आहोत. परंतु, मनाई आदेश उठेपर्यंत दरवाढ रद्द झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन जिल्हाभरात छेडू असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे. यावेळी गौतम माठेकर, अर्चित पोकळे, सुरज मठकर आदी उपस्थित होते.