शिवसेनेचा स्वबळावर लढणार ?

Edited by:
Published on: April 09, 2025 20:23 PM
views 56  views

दोडामार्ग :  येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका या स्वबळावर लढवणार आहोत. यासाठी फक्त वरिष्ठांनी यासाठी परवानगी द्यायला पाहिजे. त्यांनी जर परवानगी दिल्यास नक्कीच स्वबळावर लढवणार आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्ह्यासह दोडामार्ग तालुक्यात एक क्रमांकाचा पक्ष असेल यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून पक्षाला वेगवान दिशा देऊया असे उदगार शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी काढले. 

मणेरी येथील वेदांत सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसे नेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख प्रेमानंद देसाई, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, शिवसेना जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, तालुका संघटक गोपाल गवस, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, तिलकांचन गवस, सूर्यकांत गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अनिल शेटकर, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, नंदू गावकर, बबलू पांगम, राजदत्त वेटे, सविता नाईक, पूजा देसाई व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

श्री. परब पुढे म्हणाले की, परमे ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था भेडशी, व कोलझर विविध कार्यकारी सेवा संस्था कोलझर या दोन्ही संस्थेची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये आमच्या पक्षातील अनेकजण निवडून आले आहेत. तसेच येणाऱ्या काळातील सर्व निवडणुकातही आमच्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी निवडून येणार आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाला एक नंबरचा पक्ष बनवूया असेही श्री परब यावेळी म्हणालेत. यावेळी शैलेश दळवी, वासुदेव नाईक, बाबुराव धुरी, प्रवीण परब, गणेश धुरी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल गवस यांनीं केले तर प्रास्ताविक गणेशप्रसाद गवस यांनी मांडले. तर आभार दादा देसाई यांनी मानले. 

यांचा करण्यात आला सत्कार 

कोलझर सोसायटीत  रामचंद्र शंकर बोंद्रे, तातोबा वामनराव देसाई, उल्हास आबा देसाई, हनुमंत रामा धुरी, सूर्याजी बाबाजी नांगरे, प्रवीण बाबली परब, विलास सखाराम सावळ, विकास रामचंद्र सावंत, कृतिका किशोर देसाई, विशाखा विलास देसाई यांचा विजय झाला. तर परमे सोसायटीत शैलेश सुरेश दळवी, आत्माराम जीवबा देसाई, गणेश राघोबा धुरी, लक्ष्मण गणू मयेकर, वासुदेव विष्णू नाईक, रामकृष्ण विष्णू सावंत, संगीता शेखर वेटे, रामदास राजाराम मेस्त्री, विजय लाडू जाधव व दत्ताराम धाकू जंगले, अरुण गवंडळकर आदींचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.