आंगणेवाडी - कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेणार..!

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठकांचे आयोजन..!
Edited by: संदीप देसाई
Published on: February 14, 2024 11:48 AM
views 423  views

सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच सर्व शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांची बैठक, 'जल जिवन मिशन' व जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे स्टेशन सुशोभिकरण प्रकल्प आढावा, कुडाळ व्यापारी संकुलाबाबत बैठक, कृषी विभाग, वाळू धोरण व सिंधुदुर्ग जिल्हा महसूल यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा, पोलीस यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होणार आहेत.

या आढावा बैठकीय जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत.


  


०००००