भगव्यासह धनुष्याचा अपमान सहन करणार नाही !

शिवसैनिक शब्बीर मणियार आक्रमक
Edited by:
Published on: January 06, 2025 12:15 PM
views 359  views

सावंतवाडी : ज्या पक्षाच्या चिन्हावर आमदार दीपक केसरकर हे सलग तीन वेळा आमदार झाले त्या शिवसेना पक्षाच्या चिन्हाचा व भगव्याचा अपमान सावंतवाडीच्या एका माजी उपनगराध्यक्ष यांच्या घरासमोर करण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, शब्बीर मणियार यांनी केला आहे. भगव्यासह धनुष्यबाणाचा होणारा अपमान सहन करणार नाही असा इशारा कट्टर शिवसैनिक श्री. मणियार यांनी दिला आहे.

ते म्हणाले, स्थानिक आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेच्या भगव्या ध्वजावर व धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले असून त्यांच्याच सावंतवाडीत आज त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्यावेळी लावण्यात आलेले  झेंडे, शेले हे रस्त्यावर फेकण्यात आलेत. स्व. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटो या शेल्यांवर आहे. एकनाथ शिंदेंचाही फोटो यावर आहे. भगव्यासह धनुष्यबाणाचा अपमान हे लज्जास्पद असल्याची भावना शब्बीर मणियार यांनी व्यक्त करत हे सहन केलं जाणार नाही. हा शिवसैनिकांचा अपमान असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. याप्रसंगी उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, आशिष सुभेदार आदी उपस्थित होते.