वेंगुर्ले शहरातील चुकीच्या विकासकामांबाबत जाब विचारणार

शिवसेनेच्या मासिक सभेम ठराव
Edited by: दीपेश परब
Published on: August 13, 2025 18:28 PM
views 30  views

वेंगुर्ले- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मंगळवारी झालेल्या सभेत शहरातील चुकीच्या विकासकामांबाबत जाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी यांची भेट घेण्याचे तसेच गणेशोत्सव कालावधीत विजपुरवठा सुरूळीत रहाण्यासाठी विज विभागाला निवदेन देण्याचे एकमताने ठरविण्यात आले.

वेंगुर्ला तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मासिक सभा १२ ऑगस्ट रजी सुंदर भाटले येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती संफ कार्यालयात संपन्न झाली. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, महिला उपजिल्हा प्रमुख सुकन्या नरसुले, महिला तालुका प्रमुख साक्षी चमणकर, माजी नगरसेवक तुषार सापळे, कोमल सरमळकर, अरूणा माडये, रिया राऊत, सुधाकर राणे, अजित चमणकर, स्वरा आडेलकर, दिक्षा नार्वेकर, मनोहर येरम, संदिप केळजी आदी उपस्थित होते. 

वारंवार खंडित होणा-या वीजेमुळे तालुक्यातील जनता हैरणा झाली आहे. त्यातच गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला आहे. या सणात विज पुरवठा सुरळीत रहाण्यासाठी वीज पुरवठा कार्यालयातील अधिका-यांना भेटून निवेदन देण्याचे तसेच गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत येणा-या चाकरमान्यांना होणारा त्रास, वारंवार होणारी वाहतुक कोंडी याबाबत मुख्याधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, निशाण तलाव परिसरामध्ये असलेले गोडबोले गेट बंद केल्यामुळे भविष्यात पाणी टंचाई भासल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या सभेत उपस्थित करून याकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधले जाणार आहेत. आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यात प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कोरकमिटी निवडण्यात आली असून यामध्ये अजित राऊळ, तुषार सापळे, संदेश निकम, संदिप केळजी, शैलेश परूळेकर, अस्मिता राऊळ, सुमन निकम, कोमल सरमळकर, अरूणा माडये, दिव्या नार्वेकर, रिया राऊत यांचा समावेश असून यांनी प्रभागप्रमाणे नियोजन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. 

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तालुका प्रमुख व पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा घेऊन प्रभागामधील समस्या आणि जनतेच्या तक्रारी जाणून घेण्याचे तसेच ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ आदींचे अनुदान मिळालेले नाहीत, त्यांची यादी घेऊन तहसिलदार यांना भेटणार असल्याचे ठरविण्यात आले.