संकरित दुधाळ जनावरांच्या संख्येत वाढ करणार

अतुल काळसेकर
Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 22, 2023 18:51 PM
views 96  views

              सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून गेल्या वर्षभरात दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 1000 दुधाळ जनावरांसाठी कर्ज वाटप करण्यात आले आहे. पुढील एक वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा बँक गोपाळ सेवा दाता (कृत्रिम रेतन) सेवकांच्या मदतीने दूध उत्पादन वाढीसाठी संकरित दुधाळ जानावरांच्या संख्येत वाढ करणार असून गोपाळ सेवा दाता (कृत्रिम रेतन) यांना ऑक्टेबरच्या पहिल्या आठवड्यात गोकुळ संघामार्फत प्रशिशण देण्यात येणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून प्रशिक्षण खर्चाच्या 25% अनुदान रक्कम म्हणून रुपये रू.5000 तसेच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडून प्रशिशण खर्चाच्या 50 टक्के अनुदान रक्कम म्हणून रू. १०,०००/- हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी जिल्हा बँकेच्या प्रधान कर्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दिली                                       

           जिल्ह्यामध्ये  दुधाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी जिल्हा बँक गोकुळ संघ व दूध उत्पादक सहकारी संस्थेचे गोपाळ सेवादाता  यांची संयुक्त सभा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी संपन्न झाली त्यावेळी काळसेकर यांनी ही माहिती दिली सदर सभेस जिल्हा बँकेचे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर गोकुळ व्यवस्थापक शरद तुरंबळेकर सहाय्यक व्यवस्थापक पी व्ही दळवी,सहाय्यक व्यवस्थापक सुभाष जामदार भगीरथ  प्रतिष्ठान झारापचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर जिल्हा बँकेचे मुख्य कार्याकारी अधिकारी प्रमोद गावडे, गोकुळ संघाचे जिल्ह्यातील अधिकारी तसेच जिल्ह्यातील दूध संस्थांचे १३ प्रशिक्षित व 22 प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेले असे एकूण 35 गोपाळ सेवा दाता उपस्थित होते                           

         जिल्ह्यातील दूध संस्थांचे प्रशिक्षित 13 जणांपैकी ५ गोपाळ सेवादाता(कृत्रिम रेतन सेवक) यांना यावेळी नायट्रोजन कंन्टेनरचे वाटप जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पावनाई दूध सहकारी संस्थां मर्या मसुरे गोपाळ सेवा दाता गौरव गणेश गिरकर, कोलगाव दुग्ध सहकारी संस्था कोळगावचे महेश कुमार चव्हाण, छत्रपती शिवाजी सहकारी दूध संस्था विलवडे अमित सावंत, नंदिनी सहकारी दूध संस्था किंजवडे चे गोपाळ सेवा दाता बलराम रघुनाथ कदम, गणेश कृपा सहकारी दूध संस्था, घोणसरीचे गोपाळ सेवा दाता गणेश सुभाष मराठे यांना यावेळी नायट्रोजन कंन्टेंनरचे वाटप करण्यात आले.                       

      जिल्ह्यातील 22 प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या गोपाळ सेवादाता यांना ऑक्टोबरचे पहिले आठवड्यात प्रशिक्षण गोकुळ संघा मार्फत देण्या बाबतचे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गोपाळ कृत्रिम रेतन  सेवक यांना  प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान झाराप मार्फत  कंन्टेनरसाठी  रुपये 6000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे कृत्रिम रेतन  सेवक यांच्या नियुक्तीमुळे जनावरांचे संगोपन व्यवस्थित रित्या  होऊन शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनात वाढ होणार आहे.