
सावंतवाडी : इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघातून शालेय शिक्षणमंत्री सावंतवाडी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना मोठे मताधिक्य देणार आहोत असा विश्वास माजी आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी व्यक्त केला. आज जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचाराचा प्रारंभ श्रीदेवी माऊली मंदिर इन्सुली या ठिकाणी श्रीफळ ठेवून करण्यात आला.
यावेळी सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्तेयाने निश्चय केला की वीस तारीखला होणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्या इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघातून भरीव असे मतदान केसरकर यांना द्यावयाचे आहे. आपल्या कोकणचा विकास आपले जिल्ह्याचे भाग्यविधाते नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच शालेयशिक्षण शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झाला. अनेक योजना शासनाने सुरू केलेल्या आहेत. त्या सुरू राहण्यासाठी त्याच बरोबर आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपणाला युतीला मत देणे अत्यंत महत्त्वाच आहे. यासाठी 20 तारीख ला होणारे मतदान आपण धनुष्यबाण या निशाणीवरती करावे असे आवाहन गुरुनाथ पेडणेकर यांनी केले. यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष नारायण राणे यांनी आपल्या भागातून चांगल्या प्रकारे मताधिक्य सर्व कार्यकर्त्यांनी द्यावे सर्व कार्यकर्त्ये, पदाधिकारी नियमित चांगले काम करतात. याही निवडणुकीत चांगल्या प्रकारे काम करून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना चांगलं मताधिक्य आपल्या भागातून देऊया असे आवाहन केले. यावेळी इन्सुलि पंचायत समिती प्रभारी गुरुनाथ पेडणेकर शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे भाजपा मंडल अध्यक्ष महेश धुरी शेरला प्रभारी मधुकर देसाई माजी सभापती मानची धुरी गाव अध्यक्ष विठ्ठल पालव मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर विभाग प्रमुख रामचंद्र राजन परब विकास संस्था चेअरमन आनंद राणे माजीचेअरमन हरिश्चंद्र तारी माजी उपसरपंच कृष्णा सावंत, बूथ अध्यक्ष अजय सावंत अजय कोठावळे महादेव परब सदानंद कोलगावकर अमेय कोठावळे नाना पेडणेकर सुचिता शिंदे संजय सावंत प्रताप सावंत स साबाजी परब महेंद्र पालव दिलीप पेडणेकर प्रकाश आईर शावियर फर्नांडिस नंदू नाईक वामन बांदिवडेकर प्रभाकर धुरी सचिन दळवी राजन पेडणेकर बापू कोठावळे रवींद्र परब शेरला माजी सरपंच उदय धुरी औदुंबर पालव बाळासंजय राणे शिवराम धुरी रिया चराटकरराजन परब उमेश परब उदय देऊळकर विजय डुगल मंगेश राणे संजय मिरकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते