नितेश राणेंना ४५ हजारांचे मताधिक्य देणार : अजित कांबळे

Edited by:
Published on: November 08, 2024 17:30 PM
views 307  views

देवगड :  कणकवली विधानसभा मतदार संघात आमदार नीतेश राणे यांनी गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. मागासवर्गीय वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाल्यामुळे मागासवर्गीय समाज आमदार राणेंच्या कामावर खूष आहे. त्यामुळे 99 टक्के समाज हा नीतेश राणेंच्या पाठीशी आहे. राणेंना मतदार संघातून 45 हजाराहून अधिक मताधिक्य मिळेल,असा विश्वास माजी पंचायत समितीचे सदस्य अजित कांबळे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, मंडळ अध्यक्ष देवदत्त कदम, संघटक शैलेंद्र जाधव, विद्याधर कदम उपस्थित होते. 

आमदार राणे यांनी देवगड तालुक्यातील मागासवर्गीय समाजासाठी चांगले काम केले आहे. मात्र, विरोधक अपप्रचार करीत आहेत. मागासवर्गीय वस्तीमधील पायवाटा, रस्ते, बुद्ध विहार यासाठी मदत केली आहे. उबाठाच्या कार्यकर्त्यांनी कोणताही विकास किंवा मागासवर्गीय समाजासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे मते मागण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही.आमदार राणे यांनी देवगड पर्यटनाच्या माध्यमातून विकास केला आहे. देवगड पवनचक्की गार्डन, कंटेनर थिएटर, वॅक्स म्युझियम उभारले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते, नळयोजनेची कामे करून सुमारे 3 हजार कोटींचा निधी खर्च केला आहे. त्यामुळे राणेंचा विजय निश्चित असून 45 हजाराहून अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.