
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील प्रलंबीत विकासाचे प्रश्नावर राज्य व केंद्रशासनाचे स्तरावर पाठपुरावा करुन समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी कोलाड येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिले. खासदार सुनील तटकरे यांनी पंचायत समिती मंडणगड येथे एक महिन्यापुर्वी घेतलेल्या जनता दरबारात उपस्थित समस्यांवर प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कामांची माहीती देण्यासाठी 30 मार्च 2025 रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलते होते.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध समस्यांवर संबंधीत यंत्रणेच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांशी फोनद्वारे बोलून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना श्री.तटकरे यांनी दिल्या. यावेळी पत्रकारांनी उपस्थिती केलेल्या आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेल्या काम गतीने व्हावे याकरिता केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी व राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले यांच्याशी थेट संपर्क साधून नियोजीत वेळेत रस्त्याचे काम पुर्ण करणार असल्याचे आश्वास्थ केले. किल्ले मंडणगड चा विकास आरखडा तयार करण्याच्या सुचना विभागीय वनअधिकारी चिपळूण यांना दिल्या. मंडणगड बसस्थानकाचे आवारात सार्वजनीक स्वच्छतागृहाचे निर्मीतीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करुन महामंडळाने येथे सार्वजनीक स्वच्छता गृहाचे निर्मीतीकरिता काम हाती घ्यावी व त्यासाठी आवश्यकता भासल्यास खासदार निधीतून फंड उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगीतले. सागरी महामार्गावरील बाणकोट बागमांडला पुलाचे काम सुरु झाले असून त्याकरिता आवश्याक असणाऱ्या तांत्रीक बाबीची तयारी अंतीम टप्यात असल्याचे यावेळी सांगीतले. याचबरोबर सावित्री नदीवर म्हाप्रळ आंबेत या दोन गावांना जोडणार जुना पुल जीर्ण झाल्याने नवीन पुल राज्यशासनाकडे प्रस्तावीत केलेला असल्याचे तसेच नजीकच्या काळात होणाऱ्या अधिवेशनात पुलाचा कामाची घोषणा व त्याकरिता निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
मंडणगड तालुक्याचा पर्यचन विकास कशा पध्दतीने व्हावा याकरिता तालुकावासीयांच्या मार्गदर्शक व कृतीत आणता येणे शक्य असतील अशा सुचनांचे स्वागत असल्याचे यावेळी सुचीत केले. याचबरोबर जलजीवन मिशनचे कामाचा स्थानीक पातळीवर आढावा घेणार असल्याचे सांगीतले. तालुका पातळीवर कौशल विकास केंद्र सुरु करण्याचे व या करिता स्थानीक प्रशिक्षण व सहकारी संस्थाना अग्रक्रम देण्याची मागणी यावेळी पत्रकारांनी निवेदनाच्या माध्यमातून केली.